Skip to main content

Posts

Showing posts with the label non veg at forts

कोंबडी बाटली आणि बाई (यांच्या विळख्यात सह्याद्री)

परवा फेसबुकवर प्रकाशच्या हॉटेलची जाहिरात टाकली आणि सुधीर दादा ने कंमेंट केली. त्यावर सगळेच तुटून पडल्यासारखे कॉमेंट करायला लागले. यात दादाचा पहिला मुद्दा असा होता कि गडावर का नॉन व्हेज देताय. त्यावर माझे त्यांच्याशी बोलणे झाले, त्याचा सारांश असा: "गडावर नॉन व्हेज अजिबात दिले जात नाही. खाली पाचनई किंवा खिरेश्वर मध्ये आधी सांगितले तर ते मिळते पण परत सणवार, यात्रेचे दिवस वगळून. हा माझा फर्स्ट हॅन्ड अनुभव आहे, फार जुना पण नाही अगदी या वर्षीचा फेब्रुवारी मधला. प्रकाशने गडावर देणार नाही असे ठामपणे सांगितले, खिरेश्वर मध्ये बाळू म्हणाला यात्रा तोंडावर आहे, घरी सामान येऊन पडले आहे, बाहेर शेतात देतो अगदीच हवे असेल तर." आम्ही घेतले नाही हा भाग निराळा. यावर काही जणांचे म्हणणे असे पडले कि पुर्वी गडावर बनत नसेल का? तर त्याचे उत्तर असे आहे कि अगदीच बनत असेल, त्रास देणारे वाघ, रान डुकरे, तितर वगैरे जे काही सहज उपलब्ध होत असेल ते सगळे नक्कीच खाल्लं जात असणार. लॉजिक आहे, ऐतिहासिक पुरावा माझ्याकडे नाही. पण पण पण ... पुर्वीची बहुतेक माणसे शहाणी होती, थोडक्यात समाधानी होती. पैशाच्या मागे लागून प...