Skip to main content

रायरेश्वरचा थरार!!!

सप्टेंबर २०१२ मध्ये रायरेश्वरला ट्रेक केलेला पण भन्नाट पाऊसामुळे तेंव्हा फार काही पाहता आले नव्हते. त्यामुळे या विकेंडच्या प्लानमधे रायरेश्वरला आपसुकच मान्यता मिळाली. सागर बरोबर जाणार म्हणजे मनाजोगते पठार पाहता येईल याची खात्री होती. शनिवारी रात्री जायचे कि रविवारी पहाटे यावर देखील फार विचार करावा लागला नाही आणि रविवारी पहाटे निघायचे ठरले. शनिवारी sack रात्री भरून ठेवली होती.

रविवारी पहाटे साडेतीन च्या ठोक्याला उठून आवरले आणि ४३० ला माझ्या घरून आम्ही निघालो ते थेट कोर्ल्यात थांबलो. कोर्ल्याच्या पुढे एक दोन ठिकाणी रस्ता खराब असल्यामुळे मी चालत आणि सागर गाडी वर असे करत पूल गाठला. चालताना पायाची नखे जाणवत होती. विहिरी जवळ थांबून सकाळी घरून थर्मासमध्ये भरून घेतलेल्या चहा चा एक session करताना मी  पायाची नखे कापली, मोबाईल flight mode टाकले आणि पुढे निघालो.

खिंडीत गाडी व्यवस्तिथ lock करून शिडी पर्यंत गेलो. जाताना ढग दरीतून वर येत होते, मागे केंजळगड लपाछपी खेळायचा प्रयत्न करत होता आणि डाव्या हाताला दरीत गोळेवाडी धरण अधून मधून दिसत होते. रायरेश्वर पठार दोहोबाजूला पसरलेले आणि असंख्य धबधबे. एखादा चुकार वाऱ्यामुळे उलट उडणारा. जंगम काकांच्या घरी पोचलो तेव्हा काकूंनी नेहमीच्या अगत्यानी स्वागत केले. चुलीच्या उबेला बसून त्यांनी केलेले कांदेपोहे खाल्ले. हेल्मेट्स आणि जास्तीच्या कपडयांची पिशवी त्यांच्या ताब्यात देऊन साधारणपणे ८४५ ला आम्ही पठार भटकंतीला निघालो.

पठारावर तसे पाहण्यासाठी काहीच नाही, रायरेश्वर मंदिर पाहून झाले होतो मग थोडे इकडे तिकडे फिरावे असा विचार होता. म्हणून जवळच दिसणाऱ्या एका टेकडावर गेलो. अजून काय करता येईल याचा विचार करत होतो तेव्हा मागील आठवड्याच्या बोलण्यात झालेला नाखिंदचा उल्लेख आठवला. पण पावसाळ्यात नको असा विचार केला होता पण आत्ता हातात वेळ आहे तर निदान वाट बघून येऊ असे ठरवले आणि तडक निघालो.

सागरकडे KML फाईल होती ती मोबाईल वर सुरु करून आम्ही वाटचाल सुरु केली केली. रायरेश्वर पठारचा वारा हि एक न्यारी चीज आहे.  सोबती ला ढग आणि धुके… अधेमधे कुठे फुलांचे फोटो, कुठे धबधबा, कुठे अळम्ब्याचे फोटो असे करत पुढे जात राहिलो.

वाटेत एक पाडा लागला, तिथून एक भू भू आमच्या बरोबर निघाले. आम्ही त्याला हाकलायाचा बराच प्रयत्न केला पण तेही लोचट, मागे मागे येत राहिले.

धुके दाट झाले मी सागर ला हाका मारायचे, कधी शिट्टी वाजायचे. त्याचा stamina आणि वेग प्रचंड, मी हळू चालणारी, त्यात त्याने त्याने camouflage होणारे कपडे घातले होते, sack ही तशीच झुडुपांच्या गर्दीत तो जवळ असला कि लक्षात येणे कठीण होत होते. एके ठिकाणी शेंदूर फासलेली काही देव / दगड दिसले, आम्हाला वाटले कि आम्ही  योग्य वाटेवर आहोत.

पाऊस नव्हता पण ढगाळ वातावरणामुळे प्रचंड घाम येत होता. पाहता पाहता १२०० झाले मग जेवणाची सुट्टी करावी अश्या विचाराने एक ओहोळ गाठला आणि डबे काढले. का कुणास ठाऊक मनात विचार  येउन गेला गरज पडली तर रात्र या पठारावर नक्की काढू शकू. भू भू ला ब्रेड दिला तर त्यांनी तो आवडीने खाल्ला. मग अंड हि खाल्लं. चला आता तरतरी आली आणि पुढे जायला  निघू अश्या विचाराने सागरने परत  एकदा  मोबाईल पाहिला आणि म्हणाला अजून निम्मे अंतर जायचेय. आणि उलट बाजूला जायचेय. २ वाजे पर्यंत प्रयत्न करू जर वाट मिळाली तर पुढे जाऊ अन्यथा मागे  फिरू असे म्हणून आम्ही निघालो तर भू भू ओहोळ ओलांडून आवाज देत होते. काय येडे कुत्र आहे, खाऊन झाले तसे चालले सोडून वगैरे बडबड करून आम्ही मागे दिसणाऱ्या टेकडावर चढलो आणि एका अतिशय दाट जंगलात घुसलो मग पठार परत एक जंगल परत एक पठार असे करत करत साधारण २  तास गेले. दरी ढगांनी भरली होती, त्यामुळे नक्की कुठल्या बाजूला जात आहोत कळत नव्हते.

सागरच्या मोबाईल वर निळा डॉट म्हणजे आम्ही आणि लाल रेघ म्हणजे रस्ता पण  कुठल्याही बाजूला गेलो तरी  त्यांचा मेळ होतच नव्हता. मी  थोडी dehydrate झाले होते. तेवढ्यात  खिशात मोबाईल  vibrate झाला. माझ्या मोबाईलला तिथे मिळालेली data connectivity एक वरदान होती. मी google maps  चालु करून रायरेश्वर locate करायचा प्रयत्न केला पण ते लोड होइना.

तेवढ्यात WhatsAPP वर messages येऊ लागले, मग मनात विचार आला location share करून पाहूया, जर कोणी बऱ्या connectivity मध्ये असेल तर नक्की मदत करू शकेल.  कोणा एकाला contact करून reply ची ची वाट बघण्यापेक्षा एका ग्रुप वर location share केली. नशिबानी ध्रुव चा लगेच reply आला. काय कसे याचे सोपस्कार  न करता त्यांनी लगोलग directions दिल्या.

खरे तर त्यांनी दिलेल्या directions चुकीच्या वाटत असूनही त्या follow करायच्या ठरवल्या. अजून थोडा वेळ गेल्यावर बहुदा देवाला आमची दया आली आणि ढग थोड्या वेळासाठी गेले. ३३० ला आम्ही जिथे खायला थांबलो होतो त्या जागेच्या साधारण जवळपास आम्ही पोचलो होतो! ते पाहून आम्ही दोघेही हसत सुटलो.

दरीत आणखी खाली परत एकदा गोळेवाडी धरण डावीकडे दिसले आणि त्या पलीकडे पांडवगड… चला आता निदान location चा अंदाज तर आला. परत एकदा WhatsAPP वर messages आणि ध्रुव चे instant reply. त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही रायरेश्वर मंदिरापासून १० किलोमीटर दक्षिण पूर्वे कडे होतो. आता आम्ही कड्याच्या बाजूने चालत निघालो. परत एका ओहोळाजवळ थांबलो. थोडे ताजेतवाने होऊन पुढे निघालो. आता पठाराचा विस्तार लक्षात येत होता. आता तुरळक ठिकाणी शेण आणि गायी म्हशींच्या पावलांचे ठसे दिसत होते.

मग एक मामा आणि त्यांनी चरायला आणलेल्या आणलेल्या म्हशी दिसल्या. चला आता आपण मनुष्य वस्तीच्या जवळ आहोत हि भावना सुखद होती.

पुढे एक मामा अजून दिसले त्याना रस्ता विचारला ते म्हणाले हि वाट कुठे सोडू नका. तिथून अजून साधारण दीड तासाची तंगलतोड केल्यावर रायरेश्वराचे मंदिर दिसले. बरोबर ५४५ ला म्हणजे अंधारहोण्या पूर्वी आम्ही सुखरूप परतलो होतो. जंगम काकांच्या घरी पिठले भाकरी आणि कुरकुरीत कांदा /खेकडा भजी खाऊन आम्ही पुण्याकडे प्रस्थान केले.

Popular posts from this blog

Riki - The dog and Me -the Human

A promise that will last forever...  It was third week of November 2003. I was recovering from relapsed Malaria and pneumonia and had returned to my parent’s place from Navi Mumbai. My then husband turned up one early evening and surprised me with a gift. The gift was a cute little black Labrador retriever puppy of less than 3 months of age. (November 20, 2003) I always wanted a dog but my parent’s understanding of responsibility had always denied acceptance of a dog. We had fish and birds but a dog was too much. I had dreamt that when I will grow up I will get myself a German shepherd and my ex-husband always had dreamt of having a black lab. So obviously he picked up a black lab. When the puppy came home, my first reaction was, "ohh my baby is here!" Day one On day one, this pup sat near the chair which was like ten times his size, six months later he found that the space beneath this chair can be his hideout when a bath is called upon, and a year lat...

कुंडलिका - सावळ-घाट १९ - २० एप्रिल २०१४

एकदा डोंगरात जायची  चटक लागली  की चढाई -उतराई हि नियमित चालूच राहते. तशी आमची ही चढाई -उतराई चालूच होती, परंतु सगळे धोपट मार्गी ट्रेक्स केल्यामुळे काही  विशेष कामगिरी केल्याचे समाधान मिळत नव्हते. म्हणूनच आम्ही अनोख्या  ट्रेकच्या शोधत होतो. कुशलच्या सुपीक डोक्यातून अनेक कल्पना बाहेर पडत होत्या परन्तु उन्हाळ्याचे निमित्त करून आम्ही त्या परतवून लावत होतो.  अखेर एक दिवस, कुशलने ब्रह्मास्त्र काढले आणि सगळे या लाटेवर स्वार झाले. मुळशी जवळ असलेल्या, कुंडलिका नदीचे मूळ शोधण्याच्या उपक्रमात सामील व्हायला आम्ही सगळे उत्सुक होतो.  तसे या वर्षामधले बहुतेक treks घाई-घाईत झालेले असल्यामुळे हा trek तरी थोडा निवांत असावा असे आम्ही ठरविले.  सर्वात प्रथम या भागाची माहिती काढण्याचे काम सुरु झाले. चढाई - उतराई या  पुस्तकामधून बरीच माहिती मिळाली. कुशलने हा trek आधी ३ वेळा केला असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी माहिती होती.  हा ट्रेक off -beat  असल्यामुळे आम्ही जास्त लोक नको हे ठरवले, तरी हो - ना करतकरत १६ जणाची  team शनिवारी रात्र...

How I Got Leh'd - Fact File and Trivia Bits

Actual Itinerary:  3rd August - Pune - Delhi early morning flight, Delhi Manali Bus 4th August - Reached Manali in morning and Left for by Himachal Tourism's bus, stay at Keylong (Via Marhi, Rohtang La, Khokhsar, Sissu, Tandi) 5th August - Keylong - Leh via - Jispa, Darcha, ZingZingbar, Baralacha La, Sarchu, Pang, Tanglang La, Rumptse, Upshi, Karu 6th August - Rest, Local site Seeing - Sakthi Monastery - Festival, Chemday Monastery, Hemis Monastery 7th August - Spituk Monastery, Guru Pather Sahib - Gurudwara, Hall of Fame, Shey Palace & Monastery, Thiksey Monastery, Shanti Stupa 8th August - Pangong Lake 9th August - White Water Rafting from Chilling - Nimmo - 28 kms 10th August - Khardung La, Panamik, Sumoor Monastery, Hunder Sand Dunes & Camel Ride (Nubra Valley) 11th August - Diskit Monastery and Back to Leh Via Khardung La 12th August - Tso Moriri and back to Leh ( Mahe Bridge) 13th August - Left for Manali - Stay at Keylong 14th August - Reached manali - L...