Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

Secrets of Sanauli सिक्रेट्स ऑफ सनौली

The more you know about Past, the better prepared you're for the future. Theodore Roosevelt.  मी काही इतिहास अभ्यासक / संशोधक नाही. परंतु थिओडोर रूसवेल्ट यांच्या या वाक्याचा प्रभाव माझ्यावर निश्चित आहे. त्यामुळे जे शक्य आहे ते जाणुन घ्यायला मला आवडते. तर याच काही दिवसात टीव्ही पाहताना डिस्कवरी प्लस च्या अँप वर "सिक्रेट्स ऑफ सिनौली" अशी जाहिरात दिसली. अँप इन्स्टॉल करून खरेतर बरेच दिवस झालेले पण काही नीट बघितले नव्हते. म्हटले श्रीगणेशा या documentary ने करावा.  I didn't know what was to unfold.  तर गोष्ट सुरु होते २००५ मध्ये उत्तर प्रदेशातील एका गावात - सिनौली मध्ये. दिल्ली पासुन फक्त ६७ किलो मीटर अंतरावर असलेले हे गाव चर्चेत आले तिथे शेतात काम करताना मिळालेल्या काही सोन्याच्या तुकड्यांमुळे. मग प्रशासनाने घाईघाईनेच भारतीय पुरातत्व विभागाला माहिती दिली आणि पाचारण केले. काही महिने काम चालेले आणि "वरून" आदेश आले म्हणुन बंद झाले. ते थेट २०१८ पर्यंत. आता हे आदेश का आले, कोणी दिले हा भाग आपला आपण उमजुन घ्यायचा.   २०१८ मध्ये पुन्हा इथे उत्खनन सुरु झाले...