The more you know about Past, the better prepared you're for the future. Theodore Roosevelt.
मी काही इतिहास अभ्यासक / संशोधक नाही. परंतु थिओडोर रूसवेल्ट यांच्या या वाक्याचा प्रभाव माझ्यावर निश्चित आहे. त्यामुळे जे शक्य आहे ते जाणुन घ्यायला मला आवडते. तर याच काही दिवसात टीव्ही पाहताना डिस्कवरी प्लस च्या अँप वर "सिक्रेट्स ऑफ सिनौली" अशी जाहिरात दिसली. अँप इन्स्टॉल करून खरेतर बरेच दिवस झालेले पण काही नीट बघितले नव्हते. म्हटले श्रीगणेशा या documentary ने करावा.
I didn't know what was to unfold.
तर गोष्ट सुरु होते २००५ मध्ये उत्तर प्रदेशातील एका गावात - सिनौली मध्ये. दिल्ली पासुन फक्त ६७ किलो मीटर अंतरावर असलेले हे गाव चर्चेत आले तिथे शेतात काम करताना मिळालेल्या काही सोन्याच्या तुकड्यांमुळे. मग प्रशासनाने घाईघाईनेच भारतीय पुरातत्व विभागाला माहिती दिली आणि पाचारण केले. काही महिने काम चालेले आणि "वरून" आदेश आले म्हणुन बंद झाले. ते थेट २०१८ पर्यंत. आता हे आदेश का आले, कोणी दिले हा भाग आपला आपण उमजुन घ्यायचा.
२०१८ मध्ये पुन्हा इथे उत्खनन सुरु झाले... आणि सुरु झाली एक मोठी गोष्ट. २१०० वर्षे ख्रिस्त पुर्व काळातली! म्हणजे आजपासुन सुमारे ४००० वर्षे किंवा त्याहुनही अधिक जुनी. सिनौली एक दफनभूमी आहे. इथे काही जणांना मृत्यु नंतर पुरले आहे, काहींचे "symbolic burial" केलेलं आहे.
हे दफन वेदांमध्ये सांगितलेल्या पद्धतीने केले गेले आहे असे तज्ज्ञ म्हणतात. दही, सोमरस वगैरे ठेऊन नैऋत्य - वायव्य दिशेला. दफन असेच कापडात गुंडाळून नव्हे तर शव पेटिकांमध्ये केले गेले. या शवपेटिका होत्या तर लाकडाच्या पण मजबुती साठी त्यावर तांब्याने आकर्षक नक्षी केली होती, तसेच एखाद्या पलंगासारखे त्यांना पाय देखील होते. जे पाय देखील तांब्याने मढवले होते.
इथे मिळालेल्या अनेक वस्तु: Ochre Coloured Pottery पिवळ्या रंगाची भांडी जी आपले नाते थेट मोंहेनजो डोरो आणि हरप्पा या संस्कृती शी सांगतात. तांब्याच्या असंख्य वस्तु मिळाल्या, ज्यात महत्वाची आहे copper antenna swords. का तर ते असे कि येथे मिळालेल्या तांब्याच्या तलवारीमुळे १८२२ पासुन पडलेले कोडे सुटले. ते कसे ते डॉक्युमेंटरी मध्ये बघा. इथे मिळालेली दुसरी अत्यंत महत्वाची वस्तू म्हणजे "रथ" chariots तेही तब्बल ३. आता तज्ज्ञ लोकांच्या मते हे रथ देखील वेदांप्रमाणे बनवले आहेत आणि आर्यन invasion theory ला contradict करतात.
इतिहास म्हटले कि मते मतांतरे आलीच, या साईट विषयी पण आहेत, राहतील. ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत सगळेच अंदाजपंचे चालणार. तर अशी हि सिनौली ची गोष्ट.
डॉक्युमेंटरी सादर केली आहे मनोज वाजपेयी सारख्या मातब्बर अभिनेत्याने, परंतु इरफान खान ची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
चित्रे: साभार गुगल काका!