Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

रायरेश्वरचा थरार!!!

सप्टेंबर २०१२ मध्ये रायरेश्वरला ट्रेक केलेला पण भन्नाट पाऊसामुळे तेंव्हा फार काही पाहता आले नव्हते. त्यामुळे या विकेंडच्या प्लानमधे रायरेश्वरला आपसुकच मान्यता मिळाली. सागर बरोबर जाणार म्हणजे मनाजोगते पठार पाहता येईल याची खात्री होती. शनिवारी रात्री जायचे कि रविवारी पहाटे यावर देखील फार विचार करावा लागला नाही आणि रविवारी पहाटे निघायचे ठरले. शनिवारी sack रात्री भरून ठेवली होती. रविवारी पहाटे साडेतीन च्या ठोक्याला उठून आवरले आणि ४३० ला माझ्या घरून आम्ही निघालो ते थेट कोर्ल्यात थांबलो. कोर्ल्याच्या पुढे एक दोन ठिकाणी रस्ता खराब असल्यामुळे मी चालत आणि सागर गाडी वर असे करत पूल गाठला. चालताना पायाची नखे जाणवत होती. विहिरी जवळ थांबून सकाळी घरून थर्मासमध्ये भरून घेतलेल्या चहा चा एक session करताना मी  पायाची नखे कापली, मोबाईल flight mode टाकले आणि पुढे निघालो. खिंडीत गाडी व्यवस्तिथ lock करून शिडी पर्यंत गेलो. जाताना ढग दरीतून वर येत होते, मागे केंजळगड लपाछपी खेळायचा प्रयत्न करत होता आणि डाव्या हाताला दरीत गोळेवाडी धरण अधून मधून दिसत होते. रायरेश्वर पठार दोहोबाजूला पसरलेले आणि असंख्य धबधबे.